सूचना :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा सन २०२१ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर शुक्रवार, दिनांक १६/०७/२०२१ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी ) परीक्षा सन २०२१ साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळावरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत ( प्रिंट ) घेता येईल. मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ पुढील प्रमाणे आहे.
ज्या विद्यार्थ्यांना बैठक क्रमांक माहित नाही. अशा विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर बैठक क्रमांक उपलब्ध होणार आहे.
ही सूचना शाळांनी विद्यार्थी, पालक यांचे निदर्शनास आणून द्यावी. तसेच शाळेच्या दर्शनी भागावर सूचना लिहावी..
SSC Board, Vashi